vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राजर्षि छत्रपती शाहु महाराज जयंतीनिमित्त गुरूवारी समता दिंडी, चित्ररथ…

राजर्षि छत्रपती शाहु महाराज जयंतीनिमित्त गुरूवारी समता दिंडी, चित्ररथ…

           सांगली, प्रतिनिधी : राजर्षि छत्रपती शाहु महाराज जयंती म्हणून तसेच राज्य सामाजिक न्याय दिन म्हणून 26 जून हा दिवस साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता सांगली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस.टी स्टँड एरिया, सांगली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन समता दिंडी व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संविधान जनजागृती अभियानअंतर्गत संविधान वाचन करण्यात येणार आहे. ही माहिती समाज कल्याण सांगली कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 तसेच दिनांक 26 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे राजर्षि छत्रपती शाहु महाराजांच्या विचारांवर, जीवन कार्यावर आधारित प्रा. प्रज्ञावंत कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. शाहीर बजरंग आंबी यांचा राजर्षि छत्रपती शाहु महाराजांच्या विचारांवर आधारित पोवाडा व गीते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरीकेंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

vishwatmaklokswamivarta

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

महापौर श्रीम सुजाता पाटील यांनी विविध ठिकाणी भेटी देत केली पावसाळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी…

महाराष्ट्र भूषण राम सुतार श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी आघाडयांकडून मोर्चेबांधणीला वेग, बैठकांचं सत्र सुरु

vishwatmaklokswamivarta