vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी आघाडयांकडून मोर्चेबांधणीला वेग, बैठकांचं सत्र सुरु

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी आघाडयांकडून मोर्चेबांधणीला वेग, बैठकांचं सत्र सुरु…

राज्य प्रतिनिधी- उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर  आहे. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडत नव्या उपराष्ट्रपतींची निवड होईल.

जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. उद्या 9 सप्टेंबर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येऊ शकतात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 21 ऑगस्ट होता आणि उद्या. तर, 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही आघाड्यांकडे खासदारांचं पाठबळ नेमकं किती आहे हे स्पष्ट होईल.

संख्याबळाचा विचार करता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपप्रणित एनडीएकडे आवश्यक खासदार आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीकडून उपराष्ट्रपती निवडणूक लढवली जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. 2017 आणि 2022 यावेळच्या निवडणुकीत एनडीएनं विजय मिळवला होता.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. भाजपकडे लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 102 खासदार आहेत. ससंदेतील एनडीएच्या पक्षांचं मिळून 457 खासदार सत्ताधाऱ्यांकडे आहेत. यामुळं एनडीएचे उमदेवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवणार हे स्पष्ट आहे.

इंडिया आघाडीचा विचार केला असता काँग्रेसकडे लोकसभेत 99 आणि राज्यसभेत 27 खासदार आहेत. इंडिया आघाडीच्या दोन्ही सभागृहातील खासदारांची संख्या 300 पेक्षा अधिक आहे. मात्र, या संख्याबळावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळणं अशक्य आहे.

संबंधित पोस्ट

सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची माहिती महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास  त्यांच्या मदतीकरिता संपर्क

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड येथे सौर व हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन

रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे..!मिशन मोडवर काम करावे  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर दुरस्ती करुन घ्यावी

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले