vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे..!मिशन मोडवर काम करावे  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे..!मिशन मोडवर काम करावे  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

ठाणे, प्रतिनिधी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून, मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज ठाणे जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत केले.

  यावेळी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.डी.एस.स्वामी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय इ. विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती व नियोजन, अवजड वाहतूक नियंत्रण व नियोजन व पर्यायी मार्गाची आखणी, अपघतांची संख्या कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या कार्यवाही याबाबतचा सविस्तर आढावा घेतला.

  या बैठकीत त्यांनी ठाणे जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्पुरत्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉट व व्हलनरेबल स्पॉटच्या ठिकाणी सर्व संबंधित विभागांनी मनुष्यबळ उपलब्ध करावे, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करावे, रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरावेत, वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, गणपती आगमन व विर्सजनाच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी घालावी, ज्या-ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात ट्रॅफिक होते ती लोकेशन्स निश्चित करुन ट्रॅफिक कमी करण्यासाठी नियोजन करावे, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जिथे आवश्यक असेल तिथे अतिरिक्त साहित्य उपलब्ध करुन ठेवावे, कमीत कमी वेळेत मदत पोहोचवावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी ड्युटी चार्ट तयार करुन मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे,अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

ठाण्यात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराआमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

महिला सशक्तीकरण,खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’-API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा,ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ