vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

 पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

मुंबई प्रतिनिधी-

 मागील 48 तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना आणि प्रामुख्यानं समुद्रकिनारी भागांना पावसानं झोडपलं असून, पुढच्या 24 तासांसाठीसुद्धा या भागांसाठी अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीचाही यामध्ये समावेश असून, आता पालघर जिल्ह्यातून चिंतेत भर टाकणारं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

उपलब्ध माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत. तर, वसईतील 3 बोटींशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळं स्थानिक मासेमारांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्यातील सातपाटी बंदरातील 4 बोटी आणि खोचिवडे येथील 2 बोटींनी गुजरातच्या जाफराबाद मधील नवा बंदरात घेतला आसरा घेतल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एकूण 19 बोटी समुद्रात अडकल्या होत्या. यामधील 13 बोटी वसई, 2 खोचिवडे तर 4 सातपाटी बंदरातील बोटी होत्या. वसई बंदरातील 13 बोटिंपैकी बोटी 10 बोटी वसई बंदरात रात्री उशिरा परातल्या. मात्र 3 बोटी अद्याप बेपत्ता असल्याचं वृत्त आहे.

खवळलेल्या समुद्रानं धडकी भरतेय…

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मागील 48 तासांपासून समुद्र खवळलेल्या असून, भरतीच्या वेळी उंचच उंच लाटाही उसळत आहेत. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 65 किमी इतका असल्यानं अद्यापही समुद्रात असणाऱ्या बोटिंसाठी अनेक अडचणी उभ्या राहताना दिसत आहेत. प्रशासनाकडून तीन दिवसांपूर्वीच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परतण्याच्या दिल्या होत्या, मात्र असं असतानाही काही बोटींनी किनारा न गाठल्यानं आता हे संकट आणखी गंभीर होतना दिसत आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंद-दी-चादर’चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नाविन्यपूर्ण प्रसिद्धीवर भर द्या; नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत शाळांमधून ‘स्वीप’ उपक्रमांव्दारे विद्यार्थ्यांच्या पालक, नातेवाईकांना मतदानाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा 

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ७७.९७% गणना प्रपत्र प्राप्त