vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माहिती उपसंचालक रवी गीते यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कोकण भवनात उत्साहात पार पडला

माहिती उपसंचालक रवी गीते यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कोकण भवनात उत्साहात पार पडला

नवी मुंबई प्रतिनिधी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाचे माहिती उपसंचालक रवी गीते हे नियतवयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या चार दशकांच्या पत्रकारिता आणि शासकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी कोकण भवन, नवी मुंबई येथे एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, सहायक संचालक संजिवनी जाधव-पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, तसेच कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार मित्र उपस्थित होते.

पत्रकारितेपासून शासकीय सेवेतले यशस्वी पाऊल,रवी गीते यांचा कारकीर्दीचा प्रारंभ नामवंत वृत्तपत्रांमधून झाला. ‘लोकपत्र’, ‘नवराष्ट्र’ आणि ‘सामना’ या प्रमुख दैनिकांत त्यांनी पत्रकार म्हणून कार्य केले. सामाजिक भान, भाषेवर प्रभुत्व आणि सजग दृष्टीकोन यामुळे त्यांची पत्रकारिता वाचकप्रिय ठरली. याच अनुभवाचा उपयोग त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागात सेवा बजावताना केला.शासकीय सेवेत त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात सहायक संचालक या पदावरून प्रारंभ केला. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये समन्वयाचा उत्तम आदर्श निर्माण केला. प्रामाणिक, मनापासूनची सेवा आणि जनसंपर्क कौशल्य हे श्री. गीते यांच्या कार्यशैलीचे विशेष पैलू होते.

या कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे, मृदू वर्तनाचे आणि नेहमी मार्गदर्शक म्हणून दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. उपस्थितांनी श्री. गीते हे ‘आरोग्याबाबत जागरूक’ ‘तत्काळ निर्णय क्षमता’ असणारे शासकीय अधिकारी अशी विविध विशेषणे देत मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी रवी गीते यांनी आपल्या भावनिक भाषणात सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत अनुभव सांगितले की, “पत्रकारिता आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांत मला समाजाशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाली. माहिती व जनसंपर्क विभागाने मला भरभरून दिले. या विभागात मला उत्तम मित्र भेटले तीच माझी खरी संपत्ती आहे.”

000000

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

ओटीटी क्रांती; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

खते कुठे उपलब्ध?”आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहितीजिल्हा परिषद, ठाणे कृषि विभागाचा अभिनव उपक्रम; Blogspot द्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन..

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्याअर्जावर कार्यवाही करण्याच्या कालावधीत वाढ…

vishwatmaklokswamivarta