vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

 

जालना (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात आज विजय जल्लोष साजरा करण्यात आला. जालना शहरातील वीर सावरकर चौक येथे आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उपमहापौर राजेश राऊत, बद्रीनाथ पठाडे, युवानेते अक्षय गोरंटयाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाची सुरुवात फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “भाजपा जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हा विजय पंतप्रधानांच्या नेतृत्वावर व केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.

 

यावेळी वीरेंद्र धोका, विजय कामड, सिद्धिविनायक मुळे, सोपान पेंढारकर, सुनील पवार, अमोल कारंजेकर, गोविंद ढेंबरे, सुनील खरे, अमोल धानुरे, नारायण पवार, सुजित जोगस, शिवराज नारीयवालेसिद्धेश्वर हाजबे, देविदास देशमुख, राजेश जोशी, शिवराज जाधव, अर्जुन गेही, रोषण चौधरी, रोहित भूरेवाल, दिनेश व्यास, विजय पवार, राजेश शर्मा, नागेश अंभोरे, विकास कदम, बद्रीनाथ जांगडे, उमेश अग्रवाल, विष्णू डोंगरे, शाम उगले, गौरव गोधेकर, राजेश देसार, रमेश दानवे, शिवाजी गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे डॉ. धिरज छाबडा यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकारी, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी  अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी*उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे निर्देश