vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

राजूर, (प्रतिनिधी)-बदनापूर तालुक्यातील चनेगाव ग्रामपंचायतच्या नियोजनामुळे भरउन्हाळ्यातही पाणी वेळेवर मिळत असल्याने नागरिकांनी समाधानव्यक्त केले आहे. गावात सध्या वेळेच्या वेळी टँकरने पाणीपुरवठा होतअसल्याने आज घडीला तरी गाव पाणी टंचाई पासून दूर असल्याचे सरपंच कविता मुटकुळे-पाटील यांनी सांगितले.

येथील सरपंच कविता मुटकूळे-पाटील यांनी बोलताना सांगितले की, गावात आज मेमहिन्यातही गावकर्‍यांना पाणी मिळत असल्याने गावात कुठेही पाणीटंचाई नाहीतसेच योग्य नियोजन व ग्रामपंचायत सदस्याच्या सहकार्यामुळे गावातीलनागरिकांना पाण्यासाठी यंदा भटकंती करावी लागत नाही. परंतु इतके होऊ नये गावातील काही जण पाणी टंचाईचा आव आणत आहे.गुत्तेदाराच्या दुर्लक्षामुळे जलजीवन योजनेचे काम रखडलेतसेच चनेगावासाठी जलजीवन योजना मंजूर आहे. सदरील योजनेचे काम ही काहीप्रमाणात झाले. त्यानंतर हे काम जलदगतीने करण्यात यावा यासाठी सरपंच व गावकर्‍यांनी वेळोवेळी निवेदन संबंधित कार्यालयात देवून आंदोलनही केलीआहे. जलजीवन योजनेचे काम होऊ शकले नाही. अशाही परिस्थितीत ग्रामपंचायतसरपंच व सदस्यांच्या समन्वयेमुळे गावात टँकरद्वारे वेळेवर पाणीपुरवठाकरण्यात येत असल्याने सध्या तरी गावात पाणी टंचाई निर्माण झालेलीनाही,असे सरपंच कविता मुटकूळे- पाटील यांनी सांगितले.

०००००००००

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

vishwatmaklokswamivarta

दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील    -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

दिल्ली स्फोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा, स्फोट झालेल्या गाडीत डॉ.उमर असल्याचं डीएनए टेस्टवरुन झालं स्पष्ट

vishwatmaklokswamivarta