vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला वाहनांसह बचाव साहित्य महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहने सुपूर्द

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला वाहनांसह बचाव साहित्य महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहने सुपूर्द

नाशिक, प्रतिनिधी: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा वन विभागासाठी वन्य जीवांच्या रक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली वाहने आणि बचाव साहित्य आज जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वनविभागाला सुपुर्द करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन समारंभ आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा कार्यक्रम झाला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), उपवनंसरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट आदी उपस्थित होहोते

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन्य जीव बचाव पथकासाठी बोलेरो हे वाहन, पिंजरे वाहतुकीसाठी पिकअप वाहन व अन्य अत्यावश्यक बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यात बिबट रेस्क्यू पिंजरे, थर्मल ड्रोन, ट्रॉन्क्यूलायझर गन, ट्रॅप कॅमेरा आदी साहित्याचा समावेश होता. याबरोबरच वन्य प्राणी उपचार केंद्राचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यातून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पिंजरे वाहतुकीसाठी एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या सहकार्याने बोलेरो पिकअप वाहन उपलब्ध झाले आहे. ते सुद्धा वनविभागाला सुपूर्द करण्यात आले.

शासकीय जमिनींचे हस्तांतरणयावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांना त्यांच्या अधिनस्थ क्षेत्रातील सर्व शासकीय जमिनींचा सातबारा उतारा हस्तांतरणाचा कार्यक्रम झाला. एकूण ३५५ गटातील १ हजार ६३० हेक्टर शासकीय जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी प्राधिकरणाचे सहायक आयुक्त बाबासाहेब पारधे उपस्थित होते.

०००००बिबट प्रवण तालुक्यातील आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला मिळालेल्या सुविधा उपयुक्त ठरतील.- गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री

 

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना-नवी मुंबई  क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवार दि. 07 मार्च 2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा नंबर प्लेट बसवण्यास 30 जून पर्यंत मुदत 

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा- जिल्हाधिकारी किशन जावळे*