vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जंगल आग प्रकरणी वनविभागाची कारवाई; दोन आरोपी ताब्यात…

जंगल आग प्रकरणी वनविभागाची कारवाई; दोन आरोपी ताब्यात…

बुलडाणा, प्रतिनिधी : गिरडा(1) बीट राखीव जंगल क्षेत्रात आग लावताना दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने कारवाई करत रंगेहाथ पकडले. आरोपीवर भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आले असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी ए.एन. ठाकरे यांनी दिली.

वन विभागाच्या कारवाईमध्ये आरोपी रतन मनोहर राठोड(वय 60 वर्षे, रा. पळनये नाईक, बुलडाणा) व रामेश्वर श्रीचंद राठोड(वय 32 वर्षे, रा.हनवतखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा) याना अटक करण्यात आले. या आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (बी,सी,डी,ई), 52, 61अ, 65अ तसेच सार्वजनिक हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 4 अंतर्गत गुन्हा(क्रमांक-15839/01) दाखल करण्यात आले. तसेच दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय, बुलडाणा येथे हजर करण्यात आले असता, त्यांना एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. कायद्यानुसार, अशा गुन्ह्यांसाठी 1 ते 10 वर्षे शिक्षेची तरतूद आहे.

सदर कारवाई विभागीय वन अधिकारी दक्षता तथा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, उपवनसंरक्षक सरोज गवस व सहाय्यक वनसंरक्षक आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) ए. एन. ठाकरे, वनरक्षक गिरडा बीटचे प्रदीप प्रकाश मुंढे, वनरक्षक व्ही. जी. राऊत, बी. ए. घुले, वाहन चालक संदीप मडावी, रविंद्र तायडे, दीपक सोनुने, अरुण पंडित, अमोल चव्हाण, जितेंद्र सोनुने सहभागी होते. तसेच प्रकरणाचा पुढील तपास वनपाल एस. डी. वानखडे करतील.

नागरिकांनी जंगलात आग लावू नये तसेच पर्यावरणाचे नुकसान करण्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन वन विभागाव्दारे करण्यात आले.

000000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

बांधकाम कामगारांच्या पाठिशी शासन खंबीरपण उभे– कामगार मंत्री आकाश फुंडकर,कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताचे निर्णय– कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे शिक्षण क्षेत्रात सुविधावाढ व भरती प्रक्रिया गतीमान– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील राज्य परिवहन महामंडळ आगार व न्यायालय इमारत बांधकामांची पाहणी..

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta