vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

             मुंबई, प्रतिनिधी: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी 50 टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून तर उर्वरित 50 टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. त्या अनुषंगाने कमी उत्पन्न व कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून ग्रामपंचायतींना लोकसंख्या व उत्पन्नानुसार वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन 2022 पासून सुधारित किमान वेतन लागू करण्यात आले असून त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी साहाय्यक अनुदान शासनाकडून देण्यात येते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

  याबाबत सदस्य हेमंत ओगले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.मंत्री गोरे म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात आले असून, दर पाच वर्षांनी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून हे वेतन सुधारण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी 50 टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून देण्यात येते, तर उर्वरित 50 टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. काही ग्रामपंचायतींसाठी हा खर्च करणे कठीण होत असल्याने, लोकसंख्या व उत्पन्नाच्या आधारावर वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गतवर्षीच्या सर्व करांच्या 90% वसुली करणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे. मात्र, 90 टक्के वसुली न झाल्यास, वसुलीच्या प्रमाणानुसार राज्य शासनाचे अनुदान निश्चित केले जाते. वसुलीची अट रद्द करून 100 टक्के किमान वेतन शासनातर्फे देण्याची मागणी केली जात आहे. तथापि, ही अट रद्द केल्यास शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडेल. तसेच, वसुलीतील घट झाल्यास ग्रामपंचायतींच्या उत्पन्नावर परिणाम होऊन विकासकामांवर विपरित प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

****

संबंधित पोस्ट

वार्षिक उदयोग पाहणी सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत होणार

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

vishwatmaklokswamivarta

चित्ररथाद्वारे योजनांची व्यापक जनजागृती; नागरिकांनी लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

उत्तराखंड प्रशासनानं चारधाम यात्रेकरू आणि पर्यटकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून सुरक्षित प्रवास करण्याचं केलं आवाहन. 

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन ताण-तणाव कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta