vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

24 मार्च रोजी पुणे येथे डाक अदालत

24 मार्च रोजी पुणे येथे डाक अदालत

                सातारा, प्रतिनिधी : पोस्टाच्या सेवे विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधनकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोस्ट मास्तर जनरल, पुणे रीजन यांच्या कार्यालयामध्ये 24 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता 79 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.     या डाक अदालतमध्ये विशेषत: टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादि बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहा. पोस्टमास्टर , पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे 411001 यांचे नावे दोन प्रती सह दिनांक. 16 मार्च पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशारितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. असे पोस्टमास्टर जनरल, पुणे रीजन यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान; ‘कसं काय?’ मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’**शिवकालीन दुर्लभ शस्त्र प्रदर्शन के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम का सजीव दर्शन!*

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा*

छत्रपती संभाजीनगर येथे 19 जुलै रोजी  भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा….