vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

           जालना, प्रतिनिधी- जिल्ह्यात 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती, दि.6 डिसेंबर रोजी दरवर्षी मुस्लीम धर्मीय काळा दिवस पाळतात तर हिंदु संघटना विजयी दिवस साजरा करतात. तसेच या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.16 डिसेंबर 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.

  संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 16 डिसेंबर 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन,लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही

अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार;बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना आज ६ जुलै रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta