vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनाई-शिरसाई सिंचन योजना; बंदिस्त नलिका प्रणालीनिविदा प्रक्रिया एक महिन्यात करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

जनाई-शिरसाई सिंचन योजना; बंदिस्त नलिका प्रणालीनिविदा प्रक्रिया एक महिन्यात करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, प्रतिनिधी :- जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पारंपरिक कालव्याचे बंदिस्त नलिका वितरण प्रणाली मध्ये रूपांतर करण्यासाठीचा विस्तार व सुधारणा अंतर्गत प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतील कालव्याचे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतर करण्यासाठी निविदा प्रक्रिया एक महिन्यात केली जाईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.विधानसभा सदस्य राहुल कुल यांनी खुल्या चर योजनांचे मापदंड, जनाई शिरसाई योजना, खडकवासला- फुरसुंगी बोगदा, पुरंदर उपसा सिंचन योजना संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, खुल्या चर योजनांचे मापदंड तसेच भूमिगत चर योजनांचे मापदंड धोरण निश्चित झाल्यानंतर मापदंडाच्या निकषात बसणाऱ्या चर योजनांच्या अंदाजपत्रकांना मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येईल.पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कुपटेवाडी वितरिकेद्वारे हवेली व दौंड तालुक्यातील क्षेत्राकरिता पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन वितरिका करण्याकरिता सर्वेक्षण करण्याच्या कामास मान्यता दिली आहे. या वितरिकेच्या PDN सर्वेक्षण व संकल्पनाचे काम पूर्ण झाले असून या कामाचे संकल्पन, रेखाचित्रे व अंदाजपत्रक बनवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले, खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्राप्त असून पर्यावरण मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. दौंड, कर्जत, श्रीगोंदा, इंदापूर मधील अनेक गावातील शेती उजनी धरणाच्या बॅक वाटेवर अवलंबून आहे. या भागात उन्हाळी हंगामात पाणी उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र बॅरेज बंधारा बांधण्यास मान्यता देण्यात येत असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

रेल्वेच्या विकास जालन्याचा विकास–भास्कर आंबेकर.

vishwatmaklokswamivarta

ठाणे, पालघरसह कोकणातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा नद्यांमध्ये विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांनी व्यक्त केले समाधान …

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील सागरी किनारा स्वच्छता मोहीमेसह प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई…

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम…

vishwatmaklokswamivarta