vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन आणि दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त…

दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन, आणि

दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त…

नवी दिल्ली प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  पंतप्रधानांनी बाधित प्रदेशांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि या नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र व राज्य एजन्सी यांच्या समन्वित प्रयत्नांवर भर दिला.,मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट लिहिली आहे:

“मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दार्जिलिंग आणि आसपासच्या भागातील परिस्थितीवर अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा.”

दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त,

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथे पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की, “दार्जिलिंग येथे पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र वेदना होत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटो, ही प्रार्थना.

दार्जिलिंग आणि आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्रभावितांना सर्वतोपरी मदत पुरविण्यास सरकार कटिबद्ध आहे. “

संबंधित पोस्ट

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गतपीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न..

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठीआता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य…

विशेष सखोल पुनरीक्षण 2026′ (SIR) कार्यक्रम माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे  –जिल्हाधिकारी किशन जावळे

नाथषष्ठीनिमित्त सोमवारी (दि.९) पैठण येथेजिल्हा प्रशासनाचा ‘सेवाभक्ती संगम’

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत एकाच वेळी २,४७०.९७ कोटींची भरपाई प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू)कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta