vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारणस्थानिक बातम्या

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

राज्य प्रतिनिधी “होय! भुजबळ साहेब मराठा आणि कुणबी व  एकंदरच आरक्षण व राजकीय उद्दिष्ट पुर्तूतेसाठी पेटवली जात असलेली  सामाजिक विखारी  कटुता या संदर्भात एका बाजूचे कडवट सर्वोच्च नेते म्हणून आणि आपल्या लातूर दौऱ्यातील जाहीर आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मराठा आणि बहुजन समाजात कार्यरत विविध सामाजिक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी आपल्याशी चर्चा करण्यासाठी  तयार आहोत.

चर्चेसाठी वेळ आणि स्थळ आपण तातडीने कळवावे.!” असे आवाहन सकळ मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखेपाटील यांनी ना. छगन भुजबळ यांच्या कालच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना केले असून, पुढे बोलतांना डॉ. संजय लाखेपाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला आर्थिक मागासासाठीचे 50% पुढील 10%  आरक्षणाचा लाभ सध्या मिळत नाही; घेताच येत नाही (कारण न मागीतलेले एसईबीसी आरक्षण)  तसेच देशातील प्रस्थापित कायदा, राष्ट्रीय /राज्य मागासवर्गीय आयोगाचे विविध अहवाल व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यानुसार मराठा व कुणबी (कुणबी_मराठा, मराठा _कुणबी) या वेगवेगळ्या व स्वतंत्र जाती आहेत याची माहिती आपणास नसावी याबद्दल सखेद  आश्चर्य व्यक्त केले आहे!तसेच देशातील प्रस्थापित कायद्या नुसार कोणत्याही व्यक्तीला ला जातीला किंवा जात समुहाला दोन आरक्षण कायद्याचा लाभ घेता येत नाही; नव्हे तसे दोन कायदे लागूच नसतात याचीही माहिती  आपणास नाही हे कालच्या (ना. भुजबळ) यांच्या व्यक्तव्यावरून स्पष्ट झाले असल्यामुळे याबाबत डॉ. लाखेपाटील यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून अश्या घटनात्मक, कायदेशीर अज्ञानातूनच्या व्यक्तव्यावरूनच  राज्यातील सामाजिक वातावरण गढूळ होत असल्याने जेष्ठ नेते ना. छगनराव भुजबळ यांना योग्य वैधानिक सल्ल्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन केले आहे. नसता मराठा समाज कुणबी, एसईबीसी, ईडब्लूएस अश्या विविध आरक्षणाचा लाभ मराठा जात  घेत आहे असे धांदात  खोटे व्यक्तव त्यांनी केलेच नसते असे निदर्शनास आणून देऊन ही वैधानिक वास्तविकता समजून घेण्यासाठी/समजून सांगण्यासाठी ना. छगन भुजबळ यांच्याशी विशेष चर्चेची तयारीही डॉ. संजय लाखेपाटील यांनी दाखवली आहे आणि त्यांनी किमान ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बबनराव तायवाडे यांना ओबीसी आरक्षण विषयक वैध तरतुदीचे शासकीय सल्लागार म्हणून मंत्रीमंडळाच्या ओबीसी आरक्षण विषयक उपसमितीने नियुक्त करावे अशी आग्रही विनंती डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली असून  राज्यात मराठा समाजाने न मागितलेले आणि कायद्याच्या, घटनेच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांच्या कसौटीवर न टिकणारे आणि तसे देण्याचा राज्याला वैधानिक अधिकारच नसलेले आणि म्हणूनच मराठा समाजाला  नको असलेले 50% पुढील  एसइबीसी आरक्षण कायदा रद्द करण्यासाठी व त्यामुळे आपोआपच  लागू होऊ शकणारे  आर्थिक मागासासाठीचे ईएसडब्लू आरक्षण तातडीने परत लागू करण्यासाठी ना. छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व ना. अजित पवार यांच्या कडे मध्यस्थी करावी अशीही आग्रही मागणी केली असून, पुढे बोलतांना काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या असून ना. छगन भुजबळ यांनी श्री. बबनराव तायवाडे यांचा सल्ला घेतल्याशिवाय मराठा व कुणबी जातीच्या स्वतंत्र आरक्षणाबाबत वैधानिक अज्ञानातूनत्या एकच जाती आहेत असा अपप्रचार करू नये; 1967 च्या कायद्याचे तंतोतंत पालन करून ओबीसी आरक्षण विषयक मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल/प्रशासन यंत्रणेद्वारे कायदेशीर वैधता तपासून दिल्या जात असलेल्या ओबीसी जातसमुहातील क्र 83 वरील कुणबी जात प्रमाणपत्रांना सामाजिक गैरसमज वाढवून संघर्ष व विरोध करू नये;  ओबीसी जातसमुहातील कुणबी जातप्रमाणपत्रासाठी आग्रही आंदोलक नेते श्रीमान मनोज जरांगे आणि आपल्यातील राज्यातील सामाजिक प्रदुषण वाढवून युवकांमध्ये नैराश्य व आत्महत्या प्रवृत्ती वाढवणारा  टीआरपीसाठीचा ‘डब्लुडब्लूएफ’  कलगीतुरा तातडीने थांबवावा आणि राज्यातील निकोप व गंभीर विषयांच्या चर्चेसाठी स्पेस सोडावी अशी आग्रही विनंती केली असून ओपन मधील मराठा जातीला सध्या दिलेले परंतु बेकायदेशीर, घटनाबाह्य 50% पुढचे  एसईबीसी आरक्षणाचा  कायदा ताबडतोब रद्द करून, मुंबई उच्च न्यायालयाला तसे कळवून  संबंधित याचिका राज्य सरकारने परत घ्यावी आणि त्यामुळे राज्यातील खुल्या गटातील मराठा जातीसाठी आर्थिक मागासासाठीचे ईएसडब्लू आरक्षण आपोआप लागू होण्यासाठी मराठा जातीतील राज्यातील आमच्या विविध प्रमुख मराठा सामाजीक संघटना /पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करावे आणि या चर्चांसाठी शिष्टमंडळाने आपणास भेटण्यासाठी तातडीने वेळ द्यावा अशीही आग्रही विनंती डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली असून तशी विनंती त्यांच्या कार्यालयात संबंधित सहायकांनी नोंदवली आहे!: डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रEmail – slakhepatil@gmail.comCell – 9422215278 9819520002

संबंधित पोस्ट

राष्ट्रकुल संसदीय मंडळ अभ्यासवर्ग :जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विविध आयुधांचा वापर    – आमदार बाळासाहेब थोरात

vishwatmaklokswamivarta

नव्या वादाला सुरूवात! शनिवारवाड्यातील पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

नवीन पिढीपुढे एक आदर्श-अल रेहान -उद्योजक जगतातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शहबाज भाई

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण आंबेडकरी बौद्ध समाजाची एकजूट मैदानात उतरणार* *येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान विराट रॅली चे आयोजन ~ केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

पुरेशा लससाठ्याअभावी दिनांक १९ आणि २० ऑगस्ट २०२१ मुंबईतील शासकी,महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद,शनिवार दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणार लसीकरण**