vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जालना,(प्रतिनिधी)-काही दिवसापासून जालना शहर व परिसरात होतअसलेल्या अतिवृष्टीने जालना शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांसह अनेकशाळकरी विद्यार्थ्यांचेही पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य खराब झाल्याने मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.आधार ग्रुपचे अध्यक्ष अश्विन अंबेकर यांनी ही बाब लक्षात घेत आज शुक्रवाररोजी आधार ग्रुपचे सदस्य कुणाल देशमुख, अभिमन्यू काठोठीवाले, संदीप मगर,आकाश बारगजे, चेतन गुप्ता, गौरव इंगळे, गणेश डोके यांना सोबत घेऊन जालनाशहरातील साठे नगर व परिसरातील गोरगरीबांच्या या वस्तीत वह्या व पेन या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आधार ग्रुप हा नेहमीच वेगवेगळ्या अडचणीच्या प्रसंगी सामान्य व अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करत असतो.यापूर्वीही आधार ग्रुपच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त नागरिकांनाअन्नधान्याच्या किट वाटून आपत्तीग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्नकेला. आधार ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले

००००००००००फोटो ओळी…..११-आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकसाहित्याचे वाटप करतांना आधार ग्रुपचे अध्यक्ष अश्विन अंबेकर आदी.

०००००००००००

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद 

अखेर अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी निर्माता आणि राकेश सारंग दिग्दर्शक यांना न्याय मिळाला. 

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त कर्मचाऱ्यांना दिलासा अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित- सचिव तुकाराम मुंढे

vishwatmaklokswamivarta