vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जालना येथे अनिवासी उद्योजकता- विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

जालना येथे अनिवासी उद्योजकता- विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

जालना, प्रतिनिधी- जालना जिल्ह्यातील अनुसुचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित युवागटातील महिला-पुरूषासाठी निःशुल्क एक महिना कालावधीच्या अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजकीय प्रेरणा, उद्योजकीय गुणसंपदा, विविध संधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, उद्योगाला आवश्यक विविध परवाने, शासकीय व निमशासकीय विविध कर्ज योजना, खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, बाजारपेठ पाहाणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेची कर्ज प्रक्रिया, उद्योगांना भेटी, सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच प्रशिक्षण पश्चात उद्योग सुरू करण्यासाठी हॅन्ड होल्डिंग सपोर्ट महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केला जाईल. सदरील प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी हा फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीकडे जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्डची छायांकित प्रत असणे गरजेचे असून उमेदवार हा 18 ते 50 या वयोगटातील असावा. इच्छुकांनी सदरील कार्यक्रमांच्या अधिक माहिती व प्रवेश अर्जाकरिता जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेराक्स, टी.सी व पासपोर्ट साईज फोटोसह इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहिती साठी दि.8 डिसेंबर 2025 पुर्वी कार्यक्रम आयोजक एमसीईडीचे दिलीप शिलवंत मो.८०८७२८३०६५ किंवा मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना. फोन नं. ०२४८२- २२०५९२ येथे संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले

संबंधित पोस्ट

डाक विभागाची सांगलीत 25 मार्चला पेंशन अदालत

जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोलार टेक्निशियन व्यवसाय तुकडीस मान्यता..

महिलासक्षमीकरणजिद्दीच्या जोरावर ‘ती’ने घडविले प्रगतीचे लेणे..!शहापूरच्या सौ. प्रतिक्षा बेहरे यांचा प्रेरणादायी प्रवास

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; ८७ उमेदवारांची निवड

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास 15 ऑगस्टपासून सुरू