vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर रायगडमधील गार्गी हुट्टेनेस अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगार प्रश्नांबाबत बैठक

कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर,रायगडमधील गार्गी हुट्टेनेस अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगार प्रश्नांबाबत बैठक..

मुंबई, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मे. गार्गी हुट्टेनेस अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील पात्र कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. या कंपनीतील कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली.

विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या कंपनीतील सुमारे ३०० कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे तसेच त्यांना कायम कामगारांप्रमाणे समान वेतन व सुविधा मिळावी, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघामार्फत करण्यात आली होती. या बैठकीस भाई जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, उपसचिव (कामगार) स्वप्निल कापडणीस, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड यांच्यासह कामगार संघटनेचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगारांचे हित आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. समान कामासाठी समान वेतन हे तत्व लक्षात घेऊन संबंधित कंपनीने कामगारांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी करावी. या प्रकरणी कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही, याची शासन पूर्ण काळजी घेईल. अधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदींनुसार सर्व बाबींची तत्परतेने पडताळणी करून याबाबतचा अहवाल विहित वेळेत सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, संबंधित कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात सामोपचाराने व सकारात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यात यावा. कामगारांच्या हक्कांबाबत शासन गंभीर असून, न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्यात येईल. जे कामगार कायमस्वरूपी सेवेसाठी पात्र आहेत, त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी. त्यासाठी कामगार संघटनाच्या प्रतिनिधीना विश्वासात घ्यावे आणि हा प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडवावा असे निर्देश मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी दिले.

0000

संबंधित पोस्ट

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला होणारØ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे- वनमंत्री गणेश नाईक

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

जरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त