vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘47°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘47°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  मुंबई क्लायमेट वीकचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि एसआयईएस इन्स्टिट्यूट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘47°C’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व त्यानंतर उपाययोजनांवरील संवाद कार्यक्रम संपन्न झाला.

लघुचित्रपटानंतर ‘हवामान बदल आणि त्याचा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित चर्चासत्र पार पडले. यामध्ये लेखक व चित्रपट दिग्दर्शक श्री.तेज सिसोदिया, सिविक स्टुडिओचे श्री.श्रेय जैन आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांनी वैचारिक सहभाग घेतला.

   यावेळी वाढत्या तापमानाची तीव्रता, शहरी भागातील उष्णतेची समस्या, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम आणि नागरिकांच्या सहभागाची गरज यावर चर्चा करण्यात आली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शाश्वत जीवनशैली, पर्यावरणपूरक सवयी आणि स्थानिक पातळीवर राबवता येणाऱ्या उपाययोजनांवर विशेष भर देण्याविषयी भाष्य करण्यात आले.

  या कार्यक्रमाला एसआयईएस महाविद्यालय नेरूळ, डी वाय पाटील महाविद्यालय नेरूळ, स्टर्लिंग कॉलेज नेरूळ, बंट्स महाविद्यालय येथील 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपली मते मांडली आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत आयोजित ‘47°C’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व त्यानंतर उपाययोजनांवरील संवाद हा उपक्रम युवा पिढीमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

00000

संबंधित पोस्ट

बालविवाहमुक्त अभियानात ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

गणपती बाप्पा मोरया !! जीएसबी सेवा मंडळाने मिळवले २०२५ च्या गणेशोत्सवासाठी ४७४.६४ कोटी रुपयांचा विमा…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज च्या 42 व्या वार्षिक समारंभात शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा

असंघटीत कामगारांच्या विकासासाठी योजना राबवाव्यात  – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…

नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण