vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जेईई मेन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी ..

जेईई मेन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी …

 

      जालना, प्रतिनिधी : जेईई मेन 2026 परीक्षा दि. 21 जानेवारी 2026 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत जिल्ह्यातील जेईएस कॉलेज, इंस्टीट्युट ऑफ फार्मसी पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर या दोन परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

वरील परीक्षा केंद्राचे परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याता शक्यता असल्याने वरील परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.

परीक्षा कालावधीत या दोन परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ/फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवावेत असा कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश काढण्यात आले आहेत.

वरील आदेश दि. 21 जानेवारी 2026 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासुन ते दि. 29 जानेवारी 2026 रोजीच्या सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु…

करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता• दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात प्रतिवादी करू!हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट