vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन**नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन*

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन**नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 19 फेब्रुवारी रोजी मेगा पदयात्रेचा मुख्य कार्यक्रम सातारा येथे होणार आहे. विविध विभागांनी समन्वय साधून हा मुख्य कार्यक्रम यशस्वी करावा, तसेच या पदयात्रेत सातारा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मेगा पदयात्रा आयोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, नगर परिषद प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

19 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा आराखडा तयार करावा, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, शिवजयंतीचा प्रमुख कार्यक्रम मेगा पदयात्रा भव्य दिव्य करण्यात येणार असून जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होण्यासाठी तातडीने प्राचार्याची बैठक घ्यावी. तसेच या पदयात्रेत खेळाडू, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थ, सहभाग घ्यावा.

पदयात्रा मार्गाची नगर पालिकेन सजावट करावी, तसेच मार्गावरील खड्डे बुजवावेत. पदयात्रेत शिवकालीन पोशाख घालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करावा. शिवकालीन प्रसंगांचे सादरीकरण करणारी पथनाट्ये, चित्ररथ, लेझीम पथके , मर्दानी खेळ सादर करणारी पथके जागो जागी ठेवावे. शिवतिर्थावर शिवकालीन इतिहासाचा दैदीप्यमान वारसा सांगणारा पोवाडा कार्यक्रम आयोजित करावा. पदयात्रा मार्गावर रांगोळ्या काढाव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह रुग्णवाहिका तैनात ठेवावी. तसेच या पदयात्रेला शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनीही उपस्थित रहावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta

नियोजनपूर्ण दर्जेदार कामांसाठी शासन आपल्या सोबत – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बांधलेल्या किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीअंतिम मतदारयादी तहसिल कार्यालयात उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस