vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान,निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला…

राज्य प्रतिनिधी-

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज उत्सवी वातावरणात शांततेत पार पडला. बिहारच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वाधिक 64.66% मतदान झाले. (खालील तक्त्यानुसार) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह थेट वेबकास्टिंगद्वारे मतदानावर बारकाईने लक्ष ठेवले, बिहारमध्ये हे पहिल्यांदाच 100% मतदान केंद्रांवर सुनिश्चित करण्यात आले.

मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या नियंत्रण कक्षातून डीईओ यांच्याशी संवाद साधला.

राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले, एकूण मतदारांची संख्या 3.75 कोटींहून अधिक आहे.

बिहारमध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम (आईव्हीपी) अंतर्गत, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, फिलीपिन्स, बेल्जियम आणि कोलंबिया या 6 देशांतील 16 प्रतिनिधींनी मतदान प्रक्रिया पाहिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर, सुव्यवस्थित, पारदर्शक, कार्यक्षम आणि सहभागी निवडणुकांपैकी एक म्हणून बिहार निवडणूकीचे प्रतिनिधींनी कौतुक केले.* मतदानाची आकडेवारी आज रात्री 8.15 वाजेपर्यंत आहे आणि 1,570 अधिकाऱ्यांना ईसीआयनेट वर आकडेवारी अद्ययावत करायची आहे.

अनेक नवीन मतदार-अनुकूल उपक्रमांचा भाग म्हणून, ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो पाहून मतदार खूप आनंदी झाले. इतर नवीन उपक्रमांमध्ये मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझिट सुविधा, सहज वाचता येणारी नवीन डिझाइन केलेली मतदार माहिती स्लिप (व्हीआयएस) आणि गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 पर्यंत मतदार यांचा समावेश होता.

सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक निर्दिष्ट करण्यात आले. दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी ई-रिक्षा सुविधा देखील प्रदान करण्यात आली होती.

जिल्हानिहाय आणि विधानसभा मतदार संघ निहाय अंदाजे मतदानाचे आकडे ईसीआयनेट अॅपवर उपलब्ध आहेत.

संबंधित पोस्ट

सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

नांदेड तालुका महसूल प्रशासनाचा “शोध वंचित लाभार्थ्यांचा” विशेष उपक्रम30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta

शिवकालीन शिवशस्त्र व वाघनखे बघण्याची नागपुरकरांना संधी

vishwatmaklokswamivarta

आज (दि.२१)पासून दोन दिवस ग्रंथोत्सव; भरगच्च कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन

प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- महाज्योतीला 1500 कोटींचा निधी ; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 63 वसतिगृहे