vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा

राज्य प्रतिनिधी: सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये विविध प्रकारच्या कार्य प्रशिक्षणाची संधी या विभागाच्या वेबपोर्टल वर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. या संधीचा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजका केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

उमेदवारांची वयोमर्यादा किमान वय १८ व कमाल ३५, तसेच किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर (शिक्षण चालू असलेले उमेदवार, NAPS/ MAPS उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत), विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन आपली प्रोफाईल अद्यावत करुन या विभागाच्या वेब पोर्टलवर सातारा जिल्हयातील शासकीय,निमशासकिय, खाजगी आस्थापना, पतसंस्था, बँका, शैक्षणिक संस्था इ. यांनी कार्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन रिक्त पदांची मागणी केली आहे अशा रिक्तपदांना अर्ज करुन या योजनेचा लाभा घ्यावा.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी आस्थापनांनी आपल्याकडील प्रशिक्षणार्थीसाठीची रिक्तपदे शासन निर्णयानुसार पोर्टलवर अधिसुचित करण्यासाठी या कार्यालयाशी संपर्क करावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा असेही आवाहन सहायक आयुक्त श्री. पवार यांनी केले आहे.0000

संबंधित पोस्ट

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार…

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र -जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳 एक मे 20 26 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग