
कुंभे धबधबा व आजूबाजूच्या 1 कि.मी.परिसरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- पोलीस निरीक्षक माणगांव यांनी सादर केलेल्या पत्रान्वये माणगांव तालुक्यातील मौजे कुंभे केळगण घाट, कुंभे धरण, कुंभे बोगदा हे पावसाळी हंगामात पुणे तसेच मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे पर्यटनाचे आकर्षणाचे ठिकाण असून सदर ठिकाणी पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी होते. कुंभे धरण व धबधबा हे ठिकाण नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे सन 2024 मध्ये ट्रेकिंगकरीता आलेल्या 05 पर्यटकांपैकी 01 महिला पर्यटक सेल्फी काढण्याचे मोहापाई डोंगर कड्यावरुन पडून मयत झाली होती. तसेच कुंभे बोगदा व त्यापुढील धबधबा या ठिकाणी व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व कुंभे घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने दरड कोसळ्याची संभाव्यता असल्याने पर्यटकांची वित्त व जिवीत हानी होऊ नये याकरीता सुरक्षेच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने सदर ठिकाणी पर्यटकांना पर्यटनासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार परिसरात पुढीलबाबींकरिता दि.03 जुलै ते दि.29 सप्टेंबर 2026 या कालावधीकरिता माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.



