vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने बिहार विधानसभेच्या विजयाचा जल्लोष…

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने बिहार विधानसभेच्या विजयाचा जल्लोष…

जालना (प्रतिनिधी) : आज दि.१४ नोव्हेबर रोजी बिहार विधानसभेची मतमोजणी सकाळी ८.०० वाजता सरू झाली दुपारी २.०० वाजेपर्यंत एनडीए चे उमेदवार २०० जागांवर आघाडी घेऊन खूप मोठ्या फरकाने विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने भारतीय जनता पार्टी, जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालयासमोर जालना महानगर जिल्हा भाजपा नेते माजी आमदार कैलासजी गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, माजी जिल्हाध्यक्ष पांगारकर, युवानेते अक्षय गोरंटयाल यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मिठाई वाटून, फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना कैलास गोरंटयाल म्हणाले की, हा विजय एनडीए च्या सरकारने बिहार मध्ये देशाचे कणखर नेते नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जो विकास केला व बिहार मधील जंगल राज संपवून विकास सुशासन त्या ठिकाणी दिले त्याचीच पावती म्हणून बिहार मधील जनतेने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एनडीए सरकारला मोठे बहुमत दिले. या निवडणुकी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला असून बिहारी जनतेला विकासाबाबत आश्वासित केले तसेच बिहार निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांनी बिहार मध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षाला विश्वासात घेऊन अतिशय व्यवस्थित असे नियोजन करून या निवडणुकीचा निकाल एनडीएच्या बाजूने आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन घटक पक्षाशी समन्वय ठेऊन मोठा विजय मिळवून दिला.

यावेळी सखुबाई पणबिसरे, वर्षाताई ठाकूर, वीरेंद्र धोका, सोपान पेंढारकर, सिद्धिविनायक मुळे, देविदास देशमुख, सुनील खरे, महेश निकम, अमोल धानुरे, संजय आटोळे, राजेंद्र भोसले, रवि अग्रवाल, अमोल कारंजेकर, सुनील पवार, सुभाष सले, जिवन सले, संदीप नाईकवाडे, संजय भगत, विजय पवार, रमेश गौरक्षक, सोनू सामलेटी, बापू साळवे, अनिल सरकटे, अर्जुन गेही, शशिकांत घुगे, सुनील राठी, विष्णू डोंगरे, बाबुराव भवर, सोमनाथ गायकवाड, रामलाल जाधव, आनंद झारकंडे, प्रमोद गंडाळ, रोशन चौधरी, सोमेश काबलिये, वसंत शिंदे, डोंगरसिंग साबळे, चेतन देसरडा, सागर वाहूळकर, दत्ता जाधव, उमेश अग्रवाल, शाम उगले, मनोज इंगळे, रणजीत रीडला, संजय माधवले, अजय मिसाळ, संतोष खंडेलवाल, गणेश जल्लेवार, रोहित खोडवे, सचिन मोहता, भगवान चांदोडे, रोहित नलावडे, योगेश सामलेटी, आकाश देशमाने, उमेश पेंढारकर, अनिल यशवंते इत्यादीसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

संबंधित पोस्ट

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

आदर्श आचारसंहितेतील प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करावेत 

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta