vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन,पत्रकार संरक्षण कायदा व ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर मार्गदशन; पीसीएम जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची माहिती…

दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन,पत्रकार संरक्षण कायदा व ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर मार्गदशन; पीसीएम जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची माहिती…

 

जालना । प्रतिनिधी – दर्पणदिनानिमित्त येत्या सोमवार (दि 6) रोजी जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम) जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी दिली आहे. हा सन्मान सोहळा भोकरदन नाका, राजुर रोडवरील भारती लॉन्स येथे सकाळी 11 वा. होणार आहे.

पीसीएमच्यावतीने दर्पण दिनानिमित्त दरवर्षी पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदाही जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारास पीसीएम जिल्हारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सहा ज्येष्ठ व चार युवा पत्रकारांसह पत्रकारिता करत असतांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकार-समाजसेवकांचाही गौरव या सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती दीपक शेळके यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांमध्ये जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार अर्जुनराव खोतकर, परतुर विधानसभा मतदार संघाचे बबनराव लोणीकर, भोकरदन मतदार संघाचे संतोष पा. दानवे, बदनापूर मतदार संघाचे नारायण कुचे, घनसावंगी मतदार संघाचे हिकमत उढाण यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील पत्रकार संरक्षण कायदा स्वरुप व आव्हाने विशेष अभ्यास या विषयात पीएचडी करत असलेले प्रा. विजय कमळे हे पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर या कायद्याविषयी पत्रकारांचे काही प्रश्‍न असल्यास त्याचे समाधानही श्री कमळे यांच्याकडून करण्यात येणार आहे. डॉ. प्रभु गोरे हे ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. पत्रकारांना पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरेही डॉ. गोरे प्रसंगी देणार आहेत.

त्याचबरोबर जिल्ह्यातील खेळाडू पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय बॉक्स क्रिकेट लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पत्रकार खेळाडूंनी सोमवार (दि 6) पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यानंतर तालुकानिहाय संघ व जालना शहरातील संघ असे एकूण आठ संघामध्ये हि स्पर्धा होणार आहे.

पत्रकार सन्मान व आमदारांचा जाहीर सत्कार सोहळ्यास जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पीसीएमचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांच्यासह दर्पण जैन, गणेश काबरा, नितेश महाजन, आमेर खान, शेख चाँद पी.जे. नरेंद्र जोगड, बाबुजी तिवारी, सय्यद रफिक, सुनील भारती, प्रा. दत्ता देशमुख, मजहर सौदागर, आशिष तिवारी, दिनेश नंद, चेतन बजाज, शेख अशफाक, सौ. करुणा मोरे, शेख नबी सिपोराकर आदींनी केले आहे.

संबंधित पोस्ट

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा पारदर्शकता आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर;लाभार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध.

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार*

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर