vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध-पालकमंत्री शंभूराज देसाई*

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध-पालकमंत्री शंभूराज देसाई*

 सातारा प्रतिनिधी- कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाण संदर्भातील बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराड तहसीलदार कल्पना ढवळे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी सुपने, केसे गावातील संबंधित लोकांच्या गावठाणांचा प्रश्न हा खूप वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत प्रस्ताव पाठवून शासन स्तरावर सादर केला जाईल. शासन स्तरावर बैठक घेऊन याला शासन मान्यता घेण्यासाठी प्रयत्न करेन. यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवावा. गावठाणाचा प्रश्न प्रलंबित असलेल्या नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

यावेळी संबंधित नागरिकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. गावठाण नोंदीची अडचण असलेल्या संबंधित लोकांच्या जमिनी कोयना धरणाच्या नदीकाठावरील व भूकंपग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी वसवण्यासाठी ग्राम कमिटीद्वारे खाजगी क्षेत्रातील जमिनी संपादन करून पुनर्वसन केले आहे. आज घडीला काही जमिनीवर मूळ शेतकऱ्यांची नोंद तर काही जमिनीवर सरकार म्हणून नोंद असल्याबाबत माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.बैठकीस संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) (मिमी)सकाळी ८:०० वाजेपर्यंत:

नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?  व्रताचे नियम

vishwatmaklokswamivarta

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे आज दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा- पालकमंत्री शंभूराज देसाई