vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रम दि.३ ते ५ दरम्यान आयोजीत वाहतूक मार्गात बदल…

जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रम दि.३ ते ५ दरम्यान आयोजीत वाहतूक मार्गात बदल…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- मौजे रायपूर शिवार येथे उमुमी इस्तेमा इन्तेजामीया कमेटी (ता. गंगापूर व खुलताबाद) यांनी जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रम दि.३ ते ५ दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे. या कालावधीत या भागात भाविकांची ये-जा असेल. त्यामुळे कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी, लासूर ते रायपूर तसेच कसाबखेडा फाटा ते शिऊर बंगला या भागातील रहदारी सुरळीत रहावी यासाठी वाहतुक मार्गात खालील प्रमाणे बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत.

वाहतूक मार्गावरील बदल याप्रमाणे –

छत्रपती संभाजीनगर ते देवगाव- शिऊर बंगला मार्गे वैजापूर- येवला- नाशिककडे जाणारी जड वाहतुक-

१. छत्रपती संभाजीनगर – ए.एस.क्लब – लासुर – वैजापूर मार्गे पुढे येवला नाशिकडे जातील.

२. छत्रपती संभाजीनगर – ए.एस.क्लब – करोडी टोल नाका – समृद्धी महामार्ग मार्गे वैजापूर – येवला नाशिकडे जातील.

३. छत्रपती संभाजीनगर – ए.एस.क्लब – करोडी टोल नाका – कसाबखेडा फाटा – गल्लेबोरगाव फाटा – देवगाव रंगारी – शिऊर बंगला मार्गे पुढे जातील.

नाशिक- येवला-वैजापूर- शिऊर बंगला- देवगाव रंगारी मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतुक-

१. नाशिक – येवला – वैजापूर – लासूर – ए.एस.क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येईल.

२. नाशिक – येवला – वैजापूर – समृद्धी महामार्ग मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जातील.

३. नाशिक – येवला – वैजापूर – शिऊर बंगला – देवगाव रंगारी – गल्लेबोरगाव मार्गे कसाबखेडा फाटा – छत्रपती संभाजीनगर कडे जातील.

वाहतुक मार्गातील बदल हे दि.३ चे सकाळी ८ ते दि.५ चे मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील,असे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा 

vishwatmaklokswamivarta

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजनअधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

vishwatmaklokswamivarta

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…