vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

जालना (प्रतिनिधी) :मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जालना तालुक्यातील रोहणवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात तसेच घरात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी ज्ञानेश्वर (माऊली) उगले यांनी केली आहे.या अतिवृष्टीची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली. यावेळी महसूल अधिकारी नारायण डाके, ग्रामपंचायत अधिकारी कोथळकर, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती खांडेभराड यांनी हजेरी लावून पिकांचे पंचनामे केले.

याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकरी आप्पासाहेब साळसे, दत्ता तनपुरे, बाबासाहेब चाळसे, जपालसिंग बुंदले, किसन उगले, सतीश बुंदले, अजिंक्य उगले, अंकुश बागराज, अण्णासाहेब तनपुरे, गुड्डू शेठ, विठ्ठल काळे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची दैना लक्षात घेता तात्काळ मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन करून शासनाने तत्पर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

संबंधित पोस्ट

नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन,महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री ; मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी

vishwatmaklokswamivarta

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस

vishwatmaklokswamivarta

नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय-आरोपीला फाशीची शिक्षा,बालहक्क संरक्षण आयोगाकडून निर्णयाचे स्वागत!सबळ पुरावे, जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळे ऐतिहासिक निकाल.बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा : डॉ. संजय लाखेपाटील

शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..

संविधान दिनानिमित्त अंबरनाथ तालुक्यातील शासकीय कार्यालयांना संविधानाची प्रस्ताविका भेट

vishwatmaklokswamivarta