vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 रोजीचे अधिसुचनेनुसार महानगरपालिका निवडणुक 2025 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नवी मुंबई पोलीस आयुक्तायामधील नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका निवडणुकीकरीता दि.23 डिसेंबर 2025 पासून दि.30 डिसेंबर 2025 रोजीपर्यत निवडणुक कार्यक्रमांतर्गत उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सुचकाकडून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि.02 जानेवारी 2026 आहे.

त्याअनुषंगाने विविध राजकीय पक्ष नामनिर्देशन पत्र सादर करतेवळी उमेदवारांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करणे, विविध वाहनांचा वापर करणे, घोषणाबाजी करणे यामुळे किरकोळ कारणावरून वाद निर्माण होवून पक्ष कार्यकर्त्यामध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते तसेच रहदारीच्या नियमनात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे.

त्यानुसार पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई रश्मी नांदेडकर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामधील नवी मुंबई महानगरपालिका ह‌द्दीमधील निवडणुक निर्णय अधिकारी, 1) माता व बाल रुग्णालय इमारत, दिधा, नवी मुंबई, 2) सरस्वती विदयालय, सेक्टर नं. ०५, ऐरोली, नवी मुंबई, 3) समाज मंदिर हॉल, भुखंड कं. 10, सेक्टर नं. 07, घणसोली, नवी मुंबई, 4) अण्णासाहेब पाटील सभागृह, 1 ला मजला, सेक्टर नं. 5, कोपरखैरणे, नवी मुंबई, 5) अण्णा भाऊ साठे समाज मंदिर, प्लॉट नं. 187, सेक्टर नं.10, वाशी, नवी मुंबई, 6) जलतरण तलाव संकुल, भुखंड कं. 196, 196 ए, सेक्टर नं. 12, वाशी, नवी मुंबई, 7) आगरी कोळी भवन, प्लॉट नं. 12, सेक्टर नं. 24, नेरुळ, नवी मुंबई, 8) जे विभाग कार्यालय बेलापूर, बेलापूर भवन, सेक्टर नं. 11, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई तसेच पनवेल महानगरपलिका ह‌द्दीमधील 1) विजय दुर्ग, कळंबोली नवीन वॉर्ड ऑफीस, भुखंड क्र. 6, 7 व 8, सेक्टर 8 ई, कळंबोली, 2) सिंधुदुर्ग खारघर नवीन वॉर्ड ऑफीस, भुखंड क्र. 14 से. नं. 19, खारघर, 3) काळभैरव मंगल कार्यालय, प्रभाग समिती व कार्यालय, सेक्टर 1 ई, कळंबोली, 4) सुवर्णदुर्ग कामोठे नवीन वॉर्ड ऑफीस, भुखंड क्र. 1 बी, सेक्टर-11, कामोठे, 5) प्रशासकीय भवन, ता.पनवेल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहा समोर पनवेल, ६) उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय, दंडाधिकारी उप विभाग पनवेल यांचे कार्यालय, ठाणा नाका रोड, पनवेल यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिक्षेत्रात पुढील प्रमाणे आदेश देत आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जात असताना उमेदवारांना फक्त तीन वाहने घेवून जाता येतील. कोणताही प्रचार करण्यास, सभा घेण्यास, कोणतीही घोषणाबाजी करण्यास मनाई करण्यात येत आहे. ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे. कोणताही मजकूर लिहिण्यास अगर छापील मजकूर चिटकवण्यास मनाई करण्यात येत आहे. उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारांसोबत चार व्यक्ती यांच्या व्यतिरीक्त कोणत्याही व्यक्तीस जाण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश दि.23 डिसेंबर 2025 रोजी 00.01 वा. पासून ते दि.02 जानेवारी 2026 रोजीचे 24.00 वा. पर्यंत अंमलात राहील.

या मनाई आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.000000

संबंधित पोस्ट

शनिवारी पत्रकार दिनाचे आयोजन-विकासकुमार बागडी

रेल्वे स्टेशन जामा मशीद येथे दावत – ए- इफ्तारचा.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024″ च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना राज्य शासनाचा मदतीचा हात…

vishwatmaklokswamivarta

अंधेरीत हॉटेल कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण; 4 आरोपी अटकेत

vishwatmaklokswamivarta

महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रपणे काम महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

वारणा धरणात 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा