vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून  राज्याच्या प्रगतीला हातभार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन..

ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून  राज्याच्या प्रगतीला हातभार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन..

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली. या परिषदेतच ॲमेझॉनने राज्यात ‘ क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्टर’ क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्यानुसार ॲमेझॉन गुंतवणूक करीत आहे. यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी अमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनीच्या मुंबईतील डेटा सेंटर चे दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनीने राज्यात पहिल्या टप्प्यातील ८.३ बिलियन डॉलर गुंतवणुकीचा या उपक्रमाद्वारे शुभारंभ केला आहे. यावेळी मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (पब्लिक पॉलिसी) शाखेचे जागतिक उपाध्यक्ष मायकल पुंके, दक्षिण आशिया व भारताचे अध्यक्ष संदीप दत्ता, आशिया पॅसिफिक क्षेत्राचे संचालक विक्रम श्रीधरन, कंपनीच्या भारतातील पायाभूत सोयी सुविधा क्षेत्राचे संचालक आदित्य चौधरी, तसेच गायत्री प्रभू, शुभंकर दास, रीना मरांडा आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासन उद्योजकांना राज्यात उद्योग स्थापन करणे सहज व सोपे होण्यासाठी विविध योजनांवर काम करीत आहे. उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांचा कालावधी कमी करणे, प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ‘इज ऑफ डूईंग बिजनेस’ वॉर रूम च्या माध्यमातून जलद गतीने कार्यवाही होत आहे. उद्योजकांना परवानगीसाठी दिलेल्या प्रस्तावांची ‘रिअल टाइम इन्फॉर्मेशन’ देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

यावेळी ॲमेझॉनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेतील सिएटल येथील कंपनीच्या मुख्यालयाला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले. राज्यात वीज, पाणी पुरवठा, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी देण्यात आली.

तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ॲमेझॉन मोबाईल स्टेम लॅब उपक्रम अंतर्गत भारतातील पहिल्या ‘ थिंक बिग मोबाईल व्हॅन’ चे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. ही व्हॅन मुंबई शहरात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध संशोधन, नव विचारांनी शिक्षित करणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

नमुंमपा आस्थापनेवर ‘गट – क’ मधील सरळसेवा पदभरती..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

परदेश अभ्यास दौरा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

यळकोट यळकोट जय मल्‍हार…..!देवस्‍वारी, खंडोबाच्‍या पालखी पूजनाने #माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त….रक्त देऊ या..आशा जागवू या- एकत्रितपणे जीव वाचवू या…।