vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 च्या अंमलबजावणीसाठी दिनांक 30 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ बाबत

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 च्या अंमलबजावणीसाठी दिनांक 30 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ बाबत

 

जालना, प्रतिनिधी : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पुर्वीचे अनधिकृत भुखंड अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यास मान्यता दिलेली आहे. जालना जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील दि. 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमान्वित करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना जालना यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट इंजिनियर यांचेमार्फत प्रस्ताव दाखल करणेसाठी दिनांक 30 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तरी जालना जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जालना जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील दिनांक 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमान्वित करण्यासाठी दिनांक 30 जुन, 2026 पुर्वी विहीत कागदपत्रासह प्रस्ताव गुंठेवारी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावे. तसेच उपरोक्त प्रमाणे मुदतीत प्रस्ताव दाखल केले नसल्यास अशी अनधिकृत विनापरवाना बांधकामे पाडणेची कार्यवाही करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष), तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

 

वृत्त

संबंधित पोस्ट

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक

कवठेमहांकाळ तालुक्यात 69 लाखांचा विनापरवाना ‘इंपोर्टेड’ बेदाणा जप्त-अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

मराठा रेजिमेंट सेंटर युनिट कोटा अग्नीवीर भरती

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन