vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन दि स्पॉट तक्रारीचा निपटारा..

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन दि स्पॉट तक्रारीचा निपटारा..

 

बुलढाणा, प्रतिनिधी : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आज बुलडाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसुन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा केला.

या दरम्यान केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून शासनाच्या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. वन्यप्राण्यापासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात उपाययोजना करावे. शेतकऱ्यांचे विज प्रश्न मार्गी लावण्यासाठी सौर उर्जा प्रकल्पाना गती द्यावी. शासकीय जमीनीवर फळबाग लागवड, शेततळे निर्माण करुन शासनाच्या उत्पन्नात वाढ करण्यासंदर्भात नियोजन करावे. मानव व वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी झटका मशीन उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी शेतकऱ्याचे सामूहिक अर्ज स्विकारुन त्यांना झटका मशिन उपलब्ध करुन द्यावे, आदी निर्देश यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात  ९ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार राज्याच्या सागरी उद्योग क्षेत्राची नवी भरारी

vishwatmaklokswamivarta

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा…

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 एप्रिलला