vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दिंडोरीच्या घटनास्थळाची पाहणी

मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दिंडोरीच्या घटनास्थळाची पाहणी…

नाशिक, प्रतिनिधी: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी दिंडोरी येथे अपघात झालेल्या घटनास्थळाला भेट देत कार अपघाताची माहिती घेतली.
दिंडोरी येथे कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. भुसे यांनी भेट दिली. मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, कार अपघाताची घटना हृदयद्रावक आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार धनराज महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
०००००

संबंधित पोस्ट

कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, केंद्रीकृत तक्रार निवारण आणि परीक्षा केंद्रांच्या सुविधांवर भरविद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व भागधारकांशी सल्लामसलत; राज्यातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ₹122 कोटींची बँक फसवणूक – बँकेच्या महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल!

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢