vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत…

वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत…

     अमरावती, प्रतिनिधी : अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे बडनेरा रेल्वे स्टेशनवर उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेला रवाना केले.

नागपूर येथून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.     बडनेरा रेल्वे स्टेशनवर विदर्भासाठी असलेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झाल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आले. हारफुलांनी सजलेल्या रेल्वेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थित मान्यवरांनी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविली.

   यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. बोंडे म्हणाले, विदर्भात वंदे एक्सप्रेसचे स्वागत होत आहे. पुणे येथे जाणाऱ्या चाकरमाण्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या रेल्वेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे सुरक्षित आणि सुसज्ज असा प्रवास होणार आहे. या एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा मिळाला आहे, ही आनंदाची बाब आहे. येत्या काळातही सोयीचा आणि गतिमान प्रवास होणार यासाठी प्रयत्न करण्यात येतील

खासदार श्री. वानखेडे म्हणाले, वंदे भारतची दुपारची वेळ प्रवाशांच्या सोयीची नाही. सायंकाळची वेळ असल्यास त्याचा प्रवाशांना फायदा होईल. त्यामुळे येत्या काळात रेल्वेचा वेळ बदलण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले

0000

संबंधित पोस्ट

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना- ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

कन्नड येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी घेतला मतदार यादी विशेष सखोल पुनःरीक्षण कामाचा आढावा१०० टक्के काम पूर्ण केलेल्या बी एल ओ चा सत्कार