vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सातरगावात ‘एचपीव्ही’ लसीकरण विशेष सत्र उत्साहात

सातरगावात ‘एचपीव्ही’ लसीकरण विशेष सत्र उत्साहात

   अमरावती, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातरगाव येथे मुलींमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यानाठी ‘एचपीव्ही’ नभीकरण विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.   दाभा उपकेंद्र अंतर्गत गावातील 7 पात्र लाभार्थी मुलींनी लसीकरणाचा लाभ घेतला. भविष्यात होणाऱ्या कर्क रोगाला आळा घालण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर असल्याचे मत यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केले. लसीकरणापूर्वी लाभार्थी पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका धानुका, आरोग्य सेवक राजेंद्र चकुले, अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुजा ब्राम्हणे यांचे सहाकार्य लाभले.

 मोहिमेसाठी आरोग्य सहायिका अनिता मुळे, गटप्रवर्तिका अनिता मेश्राम. साधना भेंडे, राजेश डिबे आणि मनोज धरपाळ यांनी परिश्रम घेतले. तसेच आशा स्वयंसेविका संध्या ठाकरे, विना शेजवे आणि सिंधू कलसाईत यांचे सहकार्य लाभले. लसीकरणानंतर सर्व लाभार्थी मुलींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे व वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव धोत्रे वाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

00000000

संबंधित पोस्ट

जलजन्य आजार नियंत्रणात: अमरावती जिल्ह्याचा ‘शून्य उद्रेक’ उद्देश यशस्वीपणे साध्य…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता- 67 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला मलेरिया – डेंग्यू प्रतिबंधात्मक जाहीर शिबीरांचा लाभ

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आलेआहे

अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारेमानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची “अमृत” मार्फत सुवर्णसंधी!

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची सांगता कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta