vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्वातंत्र्यदिनी बुलढाण्यात ‘ऑपरेशन सिंदुर सन्मान’ महारक्तदान शिबिर

स्वातंत्र्यदिनी बुलढाण्यात ‘ऑपरेशन सिंदुर सन्मान’ महारक्तदान शिबिर

बुलडाणा, प्रतिनिधी हाय राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि देशी-विदेशी लिकर असोसिएशन, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी “ऑपरेशन सिंदुर सन्मान” महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सहकार विद्यामंदिर हॉल, बुलडाणा येथे सकाळी ९.३० ते 5 या वेळेत होणार आहे. या रक्तदान शिबिरात बुलढाणावासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

रक्तसंकलनाची जबाबदारी शासकीय रक्तपेढी बुलढाणा, शेगाव, खामगाव, लिलावती रक्तपेढी बुलढाणा, जनकल्याण रक्तपेढी नांदुरा, दत्ताजी भाले रक्तपेढी छत्रपती संभाजीनगर, आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी अकोला या संस्थांकडे असेल.

कार्यक्रमास जिल्ह्याचे मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार असून, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व संस्था प्रतिनिधी उपस्थित राहणार असून नागरिकांनी समाजसेवेचा संदेश देत महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान**स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे होतेय कौतुक*

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयातील कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद१,६९९ लसीकरण बूथवर १ लाख १७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

एम्स नागपूर आणि बाल आयुष फाउंडेशन यांच्यात अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) सेवावृद्धीसाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta