vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शिराळ्यात 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान मोफत आरोग्य शिबीर

शिराळ्यात 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान मोफत आरोग्य शिबीर

 

         सांगली, प्रतिनिधी) : उपजिल्हा रूग्णालय शिराळा येथे शुक्रवार, दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्व रोग निदान उपचार, शस्त्रक्रिया व दंतरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.

या मोफत आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी व उपचार, मोफत औषधोपचार, शक्य त्या सर्व मोफत शस्त्रक्रिया, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या मोफत, भव्य आरोग्य प्रदर्शन व माहिती, दंतरोगावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात येणार आहेत.

 शिबिरामध्ये तपासणी करण्यात येणारे समाविष्ट आजार – सर्व सामान्य आजार मोफत तपासणी व रोग निदान, सर्व किरकोळ शस्त्रक्रिया व तपासणी, नेत्र रोग तपासणी, शस्त्रक्रिया व उपचार, अस्थिरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, मेंदू रोग, कॅन्सर निदान, त्वचा रोग, बालरोग, कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया, सर्व पोट विकार.

00000

संबंधित पोस्ट

शिरूर तालुक्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कारवाई; मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतादूत व सफाईमित्रांची आरोग्य तपासणी

जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक

vishwatmaklokswamivarta

स्वैच्छिक रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ||

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

जालन्यात 16 फेब्रुवारी रोजी रोजी मोफत मधुमेह निदान उपचार व मार्गदर्शन शिबीर

vishwatmaklokswamivarta