
विशेष लेख-डेंग्यु:नियंत्रण व उपाययोजना
आरोग्य प्रतिनिधी-दरवर्षी सातत्याने डेंग्यु रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जगामध्ये जवळपास ५ कोटी लोकांना या रोगाचा संसर्ग होतो. भारतातही हा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या रोगामध्ये मृत्यू सुद्धा होतात. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचा फैलाव ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. या रोगाचीक साथ पावसाळ्यात जास्त प्रमाणात होते. हा रोग विषाणूजन्य रोग (अरबो व्हायरस) आहे. डेंग्यु विषाणूचे डेंग्यु – 1, डेंग्यु – 2, डेंग्यु – 3, डेंग्यु – 4 असे चार प्रकार आहेत.
प्रसार :- या रोगाचा प्रसार दुषित एडीस इजिप्ती नावाची मादी डास चावलेल्यामुळे निरोगी व्यक्तीला डेंग्यु रोग होतो. डेंग्यु विषाणुयुक्त डास मरेपर्यंत दुषित राहून अनेक व्यक्तीना चावून या रोगाचा प्रसार करतो. डासाच्या शरीरात डेंग्यु विषाणुची वाढ साधरणत: ८ ते १० दिवसांत पूर्ण होते. या रोगाचे प्रसारक एडिस इजिप्ती डास साठविलेल्या स्वच्छ पाण्यांत उदा. रांजण माठ, कुलर्स, पाण्याचे हौद, घराच्या छतावरील टाकाऊ वस्तु, नारळाच्या कुरवंट्या, टायर इ. मध्ये पैदा होतात. हे डास दिवसा चावतात. या डासांच्या पायांवर काळे पांढरे रिंग असतात. म्हणून या डासांना टायगर मॉस्क्युटो सुद्धा म्हणतात
जीवनचक्र :- एडिस इजिप्ती डासाची वाढ चार प्रकारामध्ये होते. उदा. अंडी, अळी, कोष, डासअधीशयन काळ :- ५ ते १० दिवसांचा आहे.आजाराची लक्षणे :-
अ. डेंग्यु ताप –एकाएकी तीव्रताप, तीव्र डोके दुखी, स्नायुदखी, सांधेदुखी, उलट्या होणे.दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोळे दुखी, अशक्तपणा भूक मंदावणे, ताप कमी जास्त होणे.अंगावर पुरळ येणे.
ब.रक्तस्त्रावयुक्त डेंग्यु ताप (डेंग्यु हिमोरेजिक फिचर)
१. डेंग्यु तापाची वरीलप्रमाणे लक्षणे आढळून येतात.२. त्वचेखाली रक्तस्त्राव होणे.३. नाकातून रक्तस्त्राव होणे. रक्ताची उलटी होणे.४. रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे. पोट दुखणे.५. रक्तस्त्रावयुक्त डेंग्युताप बहुतांशी १५ वर्षाखालील मुलांना होतो. मोठ्या व्यक्तींनाही होऊ शकतो.क) डेंग्यु शॉक सिंड्रोम:- डेंग्यु मध्ये जेव्हा रुग्ण बेशुद्ध होतो त्याला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते.
रोग निदान,रक्तजल नमुना तपासणी:- रक्तजल चाचणी सुक्ष्मजीव शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, (घाटी) छत्रपती संभाजीनगर येथे तपासणी करुन निश्चित रोगनिदान होते.उपचार:- या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्लानुसार वेदनाशामक औषधे व विश्रांती घेणे आवश्यक आहे. अतिशय घाम येणे, वारंवार उलट्या होणे, जिभेला कोरड पडणे अशा परिस्थितीत ओ.आर.एस. (मीठ साखर पाणी) द्रावणाचा वापर करावा.
दक्षता:- टॅब ॲस्परीन, ब्रुफेन ई औषधी देऊ नयेत. वैद्यकीय अधिकारी यांच्या देखेरेखीखाली औषधोपचार घेणे, रक्तस्त्रायुक्त डेंग्युताप (डेंग्यु हिमोरेजिक फिवर) व डेंग्यु शॉक सिंड्रोम या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाय योजना :- 1. सर्व्हेक्षण :- किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करुन हाऊस इंडेक्स, कंटेनर इंडेक्स, ब्रॅटय इंडेक्स काढण्यात येऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते. प्रत्यक्ष सर्व्हेक्षण अंतर्गत रक्त नमुन व रक्तजल नमुने घेऊन रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार करण्यांत येतो.2. डास अळी व डास नियंत्रण :- डास अळी नियंत्रण ही सर्वात महत्वाची कृती आहे. हिवताप, डेंग्यु व चिकनगुनिया चे डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात.3. डासोत्पती स्थाने :- पावसाळ्यात साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या इ.4. डासोत्पती स्थाने नष्ट करण्यासाठी आठवड्यातून एकादा पाणी साठे रिकामे करुन कोरउा दिवस पाळण्यात यावा.5. साचलेली डबके व नालया वाहत्या कराव्यात. खड्डे बुजविण्यांत यावेत. शक्य नसल्यास या पाण्यावर आठवड्यातून एकदा रॉकेल, टाकाऊ ऑईल टाकण्यात यावे.6. ॲबेटीग :- आरोग्य विभागामार्फत घरातील सांड पाण्याचे रिकामे न करता येणारे पाणीसाठ्यात योग्य प्रमाणात ॲबेटीग केले जाते.7. मच्छरदाणीचा वापर करण्यात यावा.8. जैविक उपाय योजना :- डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्यात येतात. हे मासे डासांच्या अळ्या खातात. सर्व आरोग्य संस्थेत गप्पी मासे मोफत मिळतात.9. धुर फवारणी :- उद्रेकग्रस्त भागात धुर फवारणी केली जाते. आठवड्याच्या अंतराने दोनदा केली जाते.माहितीस्रोतः- आर.बी. ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
माहिती संकलनः- जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
०००००



