vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

          नवी मुंबई प्रतिनिधी  -नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने आज पारसिक हिल, बेलापूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षदिंडीसोबत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाची संततधार असतानाही, सुखद आणि आल्हाददायक वातावरणात पेरू, चिकू, फणस, जांभूळ, सिताफळ, आवळा अशा ४० विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.

  याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उद्यान विभाग परिमंडळ 1 उपायुक्त श्री. किसनराव पलांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, परिमंडळ 1 उपायुक्त श्री.सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ २ उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त उद्यान श्रीम.ऋतुजा गवळी, सहा.आयुक्त बेलापूर डॉ. अमोल पालवे, उद्यान अधीक्षक श्री. प्रकाश गिरी तसेच इतर पर्यावरणप्रेमी नागरिक, समाजसेवक, उद्यान कामगार उपस्थित होते.

 यामध्ये विशेषत्वाने पोलीस व होमगार्ड भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चेंबूर येथील अेम अकादमीचे प्रशिक्षक श्री.अजित नाकाडे यांच्यासह त्यांचे 115 प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. सर्वांनीच अत्यंत उत्साहाने वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियनांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून, हे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गाशी नाते अधिक दृढ करीत, हरित आणि आरोग्यदायी भविष्याचा संदेश प्रसारित करण्यात आला. आगामी काळात नवी मुंबई महानगरपालिका अशाच लोकसहभागातून आणि सामूहिक प्रयत्नांतून शहराला अधिक हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यात होणार 8 चार्जींग स्टेशन कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

दहावी बारावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर*

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा

मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित**अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रमांतर्गत तीर्थक्षेत्रातील सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत

vishwatmaklokswamivarta