vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी साधणार आभासी संवाद..

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी साधणार आभासी संवाद..

ठाणे, प्रतिनिधी : ‘माय भारत’ (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दि.२७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी आभासी संवाद साधणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील बी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कल्याण आणि सेवा सदन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, उल्हासनगर -3 या दोन निवडक महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ठाणे “माय भारत” च्या जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा यांनी दिली आहे.

   या कार्यक्रमात संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक आणि तरुणांसह राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांशी आभासी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून प्रामुख्याने खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि सक्रिय सहभागाचे महत्त्व याबाबत तरुणांना मार्गदर्शन मिळणार आहे.

     राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना यशस्वी खेळाडूंच्या अनुभवातून प्रेरणा घेता येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील समर्पण, शिस्त, चिकाटी, तंदुरुस्ती आणि उत्कृष्टतेचे महत्त्वही त्यांना समजून घेता येणार आहे.तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार व्यासपीठ..         राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने ‘माय भारत’, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या स्वयंसेवकांना तरुणांमध्ये खेळ, तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

यामध्ये नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रम, सामुदायिक तंदुरुस्ती कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, सर्वसमावेशक क्रीडा उपक्रम तसेच तरुणांच्या नेतृत्वाखाली राबविता येणारे विविध तंदुरुस्ती उपक्रम यांचा समावेश असू शकतो.

  प्राप्त झालेल्या सर्वोत्तम व नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करून राष्ट्रीय स्तरावर त्यांचा विचार व अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे तरुणांना केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची नव्हे, तर देशातील क्रीडा व तंदुरुस्ती चळवळीला बळकटी देण्यासाठी आपल्या कल्पनांचे योगदान देण्याची संधी मिळणार आहे.

  भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील कल्याण व उल्हासनगर येथे होणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे, असे ठाणे “माय भारत” च्या जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस