vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

निराधार मुलांचे आधार नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न- साथी मोहिमेंतर्गत 19 अनाथ, निराधार बालकांना आधार ओळखपत्र..

निराधार मुलांचे आधार नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न- साथी मोहिमेंतर्गत 19 अनाथ, निराधार बालकांना आधार ओळखपत्र..

        सांगली, प्रतिनिधी : साथी मोहिमेंतर्गत अनाथ तसेच निराधार बालकांना देण्यात येणारे आधार ओळखपत्र हे त्यांच्या पुढील जीवनातील शैक्षणिक, रोजगारविषयक समस्या सोडविण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या मोहिमेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी केले.

साथी मोहिमेंतर्गत निराधार मुलांचे आधार नोंदणी व आरोग्य तपासणी शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडील निर्देशानुसार वैकल्पिक वाद निवारण केंद्र सभागृह, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली येथे हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरास तहसिलदार लीना खरात, अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. एन. आर. देशपांडे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि. दा. सारंगकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक मेघा पाटील, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. अशोक वाघमोडे आदि उपस्थित होते.       जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले, आज समाजात तसेच जगभरात अनेक ठिकाणी बालकांची अनेक कारणांसाठी तस्करी होत आहे. ही एक गंभीर समस्या असून जगभरातील अनेक संस्था ही समस्या मोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अनुषंगाने अनाथ व निराधार बालकांना आधार ओळखपत्र मिळाल्याने मोठा आधार मिळणार आहे, असे ते म्हणाले

     साथी मोहिमेंतर्गत निराधार बालकांचे कायदेशीर सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना ओळखीचा पुरावा म्हणून सांगली जिल्ह्यातील एकूण 19 अनाथ व निराधार बालकांना आधार ओळखपत्र देण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी यावेळी सांगितले.    स्वागत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक शंकरराव वानखडे यांनी केले.      या शिबिरास सांगली जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संतोष खंदारे, नितीन आंबेकर व इतर कर्मचारी, कै. दादुकाका भिडे मुलांचे बालगृह, शासकीय मुलींचे बालगृह ता. मिरज, वेलणकर अनाथ बालकाश्रम भगिनी निवेदिता प्रतिष्ठाण, पाठक ट्रस्ट संचलित पाठक अनाथाश्रम, सौ. सुंदराबाई शंकरलाल मालू मुलींचे बालगृह, सांगली इत्यादी अनाथाश्रम/ निरीक्षणगृह येथील एकूण 21 निराधार बालके व तेथील कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान;जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी· ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

इ संजीवनी ओपीडी’द्वारे १ लाख ७४ हजार रुग्णांना मिळाली सेवा

vishwatmaklokswamivarta

असंसर्गजन्य आजारांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभावी मोहीम

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत-लातूर कारागृहात जनजागृती शिबीर..

vishwatmaklokswamivarta