vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप*

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप*

नवी मुंबई प्रतिनिधी- भारत सरकारने देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने शासन क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देत आहे. उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना शासनामार्फत उपचारादरम्यान प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजनेअंतर्गत 1000 रुपयाची मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जात आहे. केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत या स्वरुपात मदत उद्योग समूह, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ति यांनी करावी असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

   महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून नमुंमपा कार्यक्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सीसाईड यांच्यामार्फत नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरुळ 1, शिरवणे, कुकशेत, सानपाडा व तुर्भे येथे उपचार घेणाऱ्या एकूण 100 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

  सदर रुग्णांना या अतिरिक्त पोषण आहारामुळे यशस्वी उपचार पूर्ण करण्यास मदत होईल. सदर पोषण आहार किटच्या वितरण कार्यक्रमकरिता नमुंमपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रविण कटके तसेच रोटरी क्लबमार्फत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. हर्ष मकोल, क्लबचे अध्यक्ष श्री. धनंजय सरकार व श्री. आर. एस. राघवन, श्री. सचिन भोले, श्री. नंद शाह, श्री. शैलेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

तरी केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमास सहकार्य करण्यास इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी नमुंमपा आरोग्य विभाग मुख्यालय अथवा dtomhnvm@rntcp.org या ई-मेल आयडीद्वारे ‘निक्षय मित्र’ म्हणून संपर्क साधावा आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन एकजुटीने हातभार लावावा असे आवाहन करण्यात येत आहे

00000

 

संबंधित पोस्ट

निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…!प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन

सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

छाबडा हॉस्पीटलच्या आरोग्य शिबीरात 130 रूग्णांची मोफत तपासणी

vishwatmaklokswamivarta

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

विशेष लेख -१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त….रक्त देऊ या..आशा जागवू या- एकत्रितपणे जीव वाचवू या…।