vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधान परिषद निवडणूक आचारसंहिताअंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश

विधान परिषद निवडणूक आचारसंहिताअंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध,निवडणूक आचारसंहिता कालावधीत पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सकाळी ६ ते रात्री १० वा. नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर वा कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार, इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा, त्यासाठी परवानगी घ्यावी व त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी,असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.२५ जून पर्यंत अंमलात राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोस्टर्स, बॅनर्स लावण्यावर निर्बंध,निवडणूक आचारसंहिता कालावधीत सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ता इ. ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनी राजकीय बॅनर्स, पोस्टर्स, कटआऊट्स, पेन्टिंग्ज, होर्डिंग इ. अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.वाहनांवर घोषवाक्य लिहिणे, झेंडे लावण्यावर निर्बंध,निवडणूक आचारसंहिता कालावधीत सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय ऑटो रिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर राजकीय पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे वा घोषवाक्य लिहिण्यास इ. निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.२५ जून पर्यंत अंमलात राहतील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

राज्यातल्या दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्रीडा विभागाला निर्देश.

जिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 

vishwatmaklokswamivarta

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना २० डिसेंबरपर्यंत बंदी

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक