vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ..

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील उच्च शिक्षण, शैक्षणिक संशोधन, नवोपक्रम आणि धोरणात्मक शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) स्थापन करण्यात आली आहे. परिषदेच्या प्रभावी व सातत्यपूर्ण कामकाजाच्या दृष्टीने शासनाने परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

यापूर्वी शासनाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची एका वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, संशोधनाला प्रोत्साहन, नवोपक्रमांना चालना, शैक्षणिक संस्थांमधील समन्वय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) प्रभावीपणे राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे. परिषदेच्या माध्यमातून राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता व संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

००००

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईत 1 जुलै रोजी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने आरोग्य व विद्युत विभागाच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉

श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद – तब्बल ५.५३ लाख व्ह्युव मिळवलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले माहितीपट

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

vishwatmaklokswamivarta

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta