vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी

#नांदेड , प्रतिनिधी :- जड वाहनामुळे नांदेड शहरात वाहतुक कोंडी, अपघात अशा समस्‍या उद्भवत आहेत. या अनुषंगाने नांदेड शहरात 7 जानेवारी 2026 पासून जड वाहनांना सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्‍यात आली असून या अधिसुचनेचा अंमल 7 जानेवारी 2026 पासुन सुरु होईल. जड वाहनामुळे शहरातील वाहतुक कोंडी व जडवाहन अपघाताने होणारी जिवीत हानी या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयास विविध संघटना, जनतेकडून निवेदने प्राप्‍त झाली आहेत. 16 डिसेंबर रोजी बैठकीत यासंबंधाने जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी समवेत पोलीस अधिक्षक, मार्ग परीवहन अधिकारी नांदेड यांच्यात झालेल्‍या चर्चेनुसार या समस्‍येवर उपाययोजना करण्‍यासाठी जड वाहनांना नांदेड शहरात सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्‍याचे निश्‍चीत झाले आहे. याची सर्व संबंधित जडवाहनधारकांनी नोंद घ्यावी असेही आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न 

वटवृक्ष हनुमान मंदीर येथे जन्मोत्सव सोहळा आयोजित

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने 11 ते 13 एप्रिल दरम्यान मध्‍य प्रदेशातील रायसेन येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सवाचे आयोजन

*वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पास भेट देत प्रधान सचिव श्रीम.अंशू सिन्हा यांनी व्यक्त केले समाधान**कपड्याच्या कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणारा अभिनव प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबईत

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात 17 ऑगस्टपर्यंत ‘तिरंगा आणि वंदे मातरम्’ विषयक माहितीपूर्ण प्रदर्शन