vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका -बेलापूर विभागातील प्रभाग क्र. 25,26,27,28 निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण-प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांना नोटीसा – होणार कायदेशीर कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका -बेलापूर विभागातील प्रभाग क्र. 25,26,27,28 निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण-प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांना नोटीसा – होणार कायदेशीर कारवाई

नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक कामकाजाकरिता नियुक्त कर्मचा-यांच्या प्रशिक्षणास 1 जानेवारी रोजी नेरुळ विभागापासून प्रारंभ झाला असून 2 जानेवारी रोजी बेलापूर विभागातील प्रभाग क्रमांक 25,26,27,28 यामध्ये नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण सत्र वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात पार पडले. बेलापूर विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. प्रिती पाटील यांच्या नियंत्रणाखाली 25 ठिकाणांवरील 158 मतदान केंद्रांवर नेमलेल्या कर्मचा-यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले.
मतदान व मतमोजणी कामकाजाच्या नोडल अधिकारी उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या माध्यमातून प्रशिक्षण विषयक सर्व बाबींची सुयोग्य व्यवस्था सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्री. अमित पूरी, सहा.आयुक्त तथा बेलापूर विभाग अधिकारी श्री. प्रशांत नेरकर, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे यांच्या सहयोगाने करण्यात आली होती.
यावर्षी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होत असून बेलापूर विभागातील 25,26,27 या 3 प्रभागांमध्ये अ,ब,क,ड अशा 4 जागा असून प्रत्येक मतदाराला 4 मते द्यावयाची आहेत तसेच 28 व्या प्रभागात अ,ब,क अशा 3 जागा आहेत, त्यामुळे प्रत्येक मतदाराला 3 मते द्यावयाची आहेत. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून आजच्या प्रशिक्षण सत्रात या पध्दती विषयी तसेच निवडणूक कामकाजाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बेलापूर विभागाचे सहा.निवडणूक अधिकारी श्री. अमित पूरी यांनी मतदान केंद्रावर नियुक्ती झालेल्या उपस्थित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी 1,2,3 यांना प्रशिक्षण दिले.
यावेळी बेलापूर विभागात निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत सर्व कर्मचा-यांना ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्ती हे प्रत्येक कर्मचा-यासाठी राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून निवडणूक कामासाठी नियुक्ती आदेश मिळालेल्या प्रत्येक कर्मचा-याने प्रशिक्षणास उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. तथापि या बाबीचे गांभीर्य न बाळगता 1 जानेवारी रोजी बेलापूर विभागाच्या प्रशिक्षण वर्गास अनुपस्थित राहिलेल्या 200 हून अधिक कर्मचा-यांना लगेचच प्रशासन विभागाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपआयुक्त प्रशासन तथा निवडणूक विषयक कामकाजातील मनुष्यबळ विभागाचे नोडल अधिकारी श्री. किसनराव पलांडे यांनी दिली. नोटीस बजावूनही उपस्थित न राहिल्यास संबधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात येईल असेही प्रशासन विभागाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे. 2 जानेवारी रोजीच्या प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या कर्मचा-यांनाही नोटीसा बजाविण्यात येत आहेत.
यापुढील दिघा विभागातील प्रभाग क्रमांक 1,2,3 करिता नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण रविवार, दि.4 जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे, सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.याची संबधितांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण..

मदरशामधील तकरीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने अलिना मुसा खान सन्मानित

vishwatmaklokswamivarta

नवीन कायद्याद्वारे जलद व सुलभ न्याय – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी,मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

हिंद केसरी कुस्ती स्पर्धांसाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील – जिल्हाधिकारी संतोष पाटील

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य..