vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुष्काळाच्या संभाव्य स्थितीवर जिल्हास्तरीय आढावा;पीक पेरा नोंदी, पाणी व चारा टंचाईचे सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

दुष्काळाच्या संभाव्य स्थितीवर जिल्हास्तरीय आढावा;पीक पेरा नोंदी, पाणी व चारा टंचाईचे सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

 

बुलढाणा, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ मधील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून पाणी, चारा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पूर्वनियोजन करावे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य व मदत मिळेल, यासाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या मूल्यमापनाबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आणि तालुका स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून १०० टक्के पीक पेरा नोंदी तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले. तलाठी, ग्रामसेवक व संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची अचूक नोंद करावी. या कामावर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी नियमित देखरेख ठेवावी.

शेतातील पिकांची काढणी सुरू होण्यापूर्वी पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी. शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणीचे महत्त्व समजावून सांगून त्यांना आवश्यक सहकार्य करावे. ई-पीक पाहणीच्या नोंदी अचूक असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. तलाठी स्तरावर प्रलंबित असलेल्या ई-पीक पाहणी नोंदींची तातडीने तपासणी करून त्या मंजूर कराव्यात. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्यासाठी प्राधान्याने पाणी आरक्षित करावे. तालुक्यातील उपलब्ध विहिरी व अन्य पाणीस्रोतांची पाहणी करून त्यांची स्थिती तपासावी. जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करावे. पाणी व चारा उपलब्धतेच्या ठिकाणांची नियमित पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात.

संकटग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांना शासनाच्या उपलब्ध उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा. आगामी काळातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून ग्राम, तालुका व जिल्हास्तरावर पाणीटंचाईचे सूक्ष्म नियोजन करावे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून पाणी आरक्षण, चारा उपलब्धता आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबत सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

महाड शहरातील नवीपेठ महाड पोस्ट ऑफिससाठी जागेची आवश्यकताइच्छुकांनी लेखी अर्ज सादर करावेत

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर…

मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती