vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बुलढाण्यात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; एकाच दिवशी १३ केंद्रांवर भरती मेळावे

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बुलढाण्यात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; एकाच दिवशी १३ केंद्रांवर भरती मेळावे

 

बुलढाणा, प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कार्यकाळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे’ आयोजन करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील १३ विविध तालुक्यांमधील केंद्रांवर एकाच दिवशी सकाळी ८ ते ६ या वेळेत हे मेळावे पार पडणार आहेत. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना आणि कंपन्यांमधील रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार संबंधित आस्थापनांशी थेट संवाद साधून रोजगाराची संधी मिळवता येईल.

मेळाव्याची प्रमुख ठिकाणे :१. नांदुरा: श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय२. मोताळा:केबीजे आयटीआय (KBJ ITI), बोराखेडी३. सिंदखेड राजा: राजमाता पॅरामेडिकल कॉलेज४. बुलढाणा: मॉडेल डिग्री कॉलेज५. चिखली: श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय६. मेहकर: एमईएस (MES) कला आणि वाणिज्य महाविद्यालय७. लोणार: भगवान बाबा महाविद्यालय८. मलकापूर: जनता कला वाणिज्य महाविद्यालय९. जळगाव जामोद: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय१०. खामगाव: शासकीय पॉलिटेक्निक११. खामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस१२. शेगाव: सरस्वती कॉलेज१३. देऊळगाव राजा: श्री व्यंकटेश कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय

२१ ते २४ सप्टेंबर दरम्यान मोफत सॉफ्ट स्किल प्रशिक्षण: रोजगार महाकुंभचा अधिकाधिक लाभ युवकांना व्हावा याकरिता २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक तालुक्यातील शासकीय आयटीआय (ITI) येथे विनामूल्य ‘सॉफ्ट स्किल प्रशिक्षणाचे’ आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांना मुलाखत कशी द्यावी आणि प्रभावी रिज्युमे (Resume) कसा तयार करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जात आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक उद्योजक व आस्थापनांनी आपल्याकडील रिक्त पदांची माहिती विहित नमुन्यात सादर करावी, तसेच सर्व नोकरीइच्छुक उमेदवारांनी पूर्व-प्रशिक्षणाचा लाभ घेऊन २९ सप्टेंबर रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारक बैठक

जागतिक युवा दिना निमित्त कौशल्य सप्ताहाचे औचित्य साधून करीअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी: जिल्ह्यात 5 कौशल्य विकास केंद्रप्रशिक्षण संस्थांकडून 17 ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव आमंत्रित

vishwatmaklokswamivarta

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती;अर्ज मागविण्यात आले