vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती;अर्ज मागविण्यात आले

,इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती;अर्ज मागविण्यात आले

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS Quacquarelli symmonds ranking(जगभरातील विद्यापीठांची क्रमवारी) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या ७५ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय, अभ्यासक्रमानिहाय जागा उपलब्ध आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.obcbahujankalyan.maharashatra.gov.in किंवा https://.obcbahujankalyan.maharashatra.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि.१७ मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वा. पर्यंत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, आकार प्रिमायसेस, दुसरा मजला एम.एच.बी.कॉलनी, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स, समता नगर, येरवडा पुणे ४११००६ येथे दोन प्रतीत सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण

माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…

हिंदी दिवसानिमित्त दुर्गामाता विद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित

vishwatmaklokswamivarta

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

vishwatmaklokswamivarta

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝